उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक संपन्न

मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापनेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यासंदर्भात सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विभागांतर्गत येत्या १०० दिवसांत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना व उपक्रमांचा आढावा देखील घेतला . विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासक्रम सुधारणा, संशोधनाला चालना, तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या संधी तसेच विविध उपाययोजनांवर त्यांनी चर्चा केली.
यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.