नामदार चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत ‘मानसी’ या उपक्रमातील लेकींसाठी खास ‘छावा’ सिनेमाच्या स्क्रीनिंगचे आयोजन

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘मानसी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातील लेकींसाठी आज त्यांनी खास ‘छावा’ सिनेमाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित केले होते. यावेळी या उपक्रमातील सर्व महिला आणि मुली यांनी या चित्रपटाचा आनंद घेतला.
चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सोयी सुविधा नेहमीच पूर्ण करण्यासाठी प्रयन्त करत असतात. कोथरूडमधील महिला आणि मुलींसाठी त्यांनी मानसी या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत मुलींच्या गरजा ओळखून त्यांना अनेक महत्वपूर्ण सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. याच मानसी उपक्रमांतर्गत या मुलींना मोफत छावा चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित केले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. हा चित्रपट पाहून अनेक मुली भावुक झाल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि बलिदान पाहून मुलींचे डोळे पाणावले होते, कित्येकांना हुंदका अनावर झाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हेदेखील आपलं दैवत आहे. धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान देऊन एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा हा प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मानसी उपक्रमातील लेकींसाठी आज खास ‘छावा’ सिनेमाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित केले होते.