राजा शिवराय प्रतिष्ठानच्या प्रशालेत “विद्यार्थ्यांमधील स्थूलपणा आणि पौष्टिक आहार” विषयावर कार्यशाळेचे आयोजन… नामदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्या वतीने कोथरुड मतदारसंघातील राजा शिवराय प्रतिष्ठानच्या प्रशालेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी “विद्यार्थ्यांमधील स्थूलपणा आणि पौष्टिक आहार” विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्थूलपणा आणि पौष्टिक आहार” याविषयी पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आहाराची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत पाटील यांनी मार्गदर्शन केले. चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गायनाची कला देखील सादर केली.
यावेळी माजी मंत्री शशिकांतभाऊ सुतार, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.