“व्यर्थ ना हो बलिदान” हा देशभक्ती पुरस्कार वितरण सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : वंदेमातरम् संघटना पुणे शहर व जिल्हा युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वंदेमातरम् संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य असा “व्यर्थ ना हो बलिदान” देशभक्ती पुरस्कार वितरण सोहळा रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शहीद दिन रोजी म्हणजेच २३ मार्च रोजी वंदे मातरम् संघटना आणि युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असलेल्या व्यक्तिमत्त्वांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते वंदे मातरम् संघटना आणि युवा फिनिक्स ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या “व्यर्थ न हो बलिदान” पुरस्काराअंतर्गत अध्यात्मिक गुरू संप्रसाद विनोद यांना जीवनगौरव, एस. के. जैन यांना शिक्षण गौरव, सामाजिक कार्याबद्दल राजेश पांडे, महेंद्र चव्हाण यांना क्रीडा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी एअर मार्शल भूषण गोखले, आ. हेमंत रासने यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.