चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत ‘मानसी’ या उपक्रमातील दुसऱ्या शाखेतील लेकींसाठी खास ‘छावा’ सिनेमाच्या स्क्रीनिंगचे आयोजन

पुणे : कोथरुड मतदारसंघातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी सुरू केलेल्या “मानसी” उपक्रमातील दुसऱ्या शाखेतील मुलींसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी “छावा” सिनेमाच्या विशेष शो चे आयोजन केले होते. यावेळी मुलींनी चित्रपटाचा आनंद घेतला. हिंदवी स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्याग आणि बलिदान पाहून मुली अतिशय भावुक झाल्या होत्या.
चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सोयी सुविधा नेहमीच पूर्ण करण्यासाठी प्रयन्त करत असतात. कोथरूडमधील महिला आणि मुलींसाठी त्यांनी मानसी या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत मुलींच्या गरजा ओळखून त्यांना अनेक महत्वपूर्ण सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. याच मानसी उपक्रमांतर्गत या मुलींना मोफत छावा चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हेदेखील आपलं दैवत आहे. धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान देऊन एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा हा प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मानसी उपक्रमातील लेकींसाठी आज खास ‘छावा’ सिनेमाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित केले होते.