जेपीजेव्ही एज्युकेशन फाऊंडेशनच्या रिया इंटरनॅशनल स्कूलच्या आंबेगाव शाखेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

15

पुणे : जेपीजेव्ही एज्युकेशन फाऊंडेशनच्या रिया इंटरनॅशनल स्कूलच्या आंबेगाव शाखेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले . यावेळी उपस्थित सर्वांना पाटील यांनी गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले कि, “शाळेने खेळासोबत मुलांना शिस्त आणि चांगल्या सवयी लागतील, याकडे विशेष लक्ष द्यावे”, अशी भावना यावेळी व्यक्त केली. तसेच, पालकांनी मुलांशी मातृभाषेतून बोलण्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी चिराग डेव्हलपर्सचे विनोदकुमार मित्तल, अर्पण चॅटर्जी, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह इतर मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.