भाजपा पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे यांचे जनसंपर्क कार्यालय तथा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उदघाटन करण्यात आले. दरम्यान भाजपा पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे यांचे जनसंपर्क कार्यालय तथा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी भाजपा पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे यांचे जनसंपर्क कार्यालय तथा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, हे कार्यालय सुविधा त्वरेने देणारे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच हर्षदा फरांदे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे देखील उपस्थित होते.