राजस्थान दिनानिमित्त आयोजित पुणे शहर राजस्थान आघाडी तर्फे राजस्थान गौरव महोत्सव उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : राजस्थान दिनानिमित्त पुणे शहर राजस्थान आघाडी तर्फे राजस्थान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन सर्व राजस्थानी बांधवांना राजस्थान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राजस्थान गौरव महोत्सव जल्लोषात सुरु झाला. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी राजस्थानी नृत्याचा पाटील यांनी आनंद घेतला. यावेळी त्यांनी उपास्थितांना मार्गदर्शन देखील केले.
या कार्यक्रमात राजस्थान आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सुनीलजी गेहलोत, भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य उमेश चौधरी, जत महासभेचे युवा अध्यक्ष ओमप्रकाश जत, राजस्थान आघाडी सरचिटणीस रामलाल काग, भाजपा कोथरूड मंडळ अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यासोबतच राजस्थानी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.