मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार प्रदान सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न

सांगली : जत येथे मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार प्रदान सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी पाटील यांच्या हस्ते समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले, सामाजिक बांधिलकी म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणं, ही आपली जबाबदारी आहे. यातून पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रोत्साहन मिळते, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासदादा जगताप, रवि तमणगौडा, रविंद्र आरळे, कार्यकारिणी सदस्य धनराज वाघमारे, शिवराज काटकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमास विविध मान्यवर, पत्रकार बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे हा सोहळा अधिक प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.