भाजप पुणे शहरची संघटन पर्वाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे :भारतीय जनता पार्टी पुणे शहरची संघटन पर्वाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक मंगळवारी घरकुल लॉन्स येथे पार पडली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी संघटनात्मक पातळीवरील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत सभासद नोंदणी, सक्रिय सभासद त्याचप्रमाणे बूथ समिती गठन या विषयाचा आढावा घेतला. संघटन पर्वात सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतल्याबद्दल चंद्रकांतनं पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. आता सक्रीय सभासद नोंदणीसह सर्वांनी लवकरात लवकर बूथ समिती गठित करुन, त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
प्राथमिक सदस्य नोंदणीत कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर ‘पुणे शहर’ने केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी देखील सर्व कार्यकर्त्यांचे घेतलेल्या मेहनतीबद्दल अभिनंदन केले. यावेळी मोहोळ यांनी बूथ कमिटी गठित करून देण्यासंदर्भातही मार्गदर्शन केले.
यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधाताई कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, संघटनमंत्री मकरंदजी देशपांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, आमदार हेमंत रासने यांच्यासह सर्व मा. नगरसेवक, सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित होते.