अंतर योग फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती घेऊन युवा पिढीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगविद्येचा अंगिकार केला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

14

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई येथे ‘अंतर योग फाउंडेशन’ला सदिच्छा भेट दिली. युवा पिढीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगविद्येचा अंगिकार केला पाहिजे, असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, अंतर योग फाउंडेशनचे मुख्य ध्येय हे लोकांना योग आणि आध्यात्मिकतेच्या मार्गावर घेऊन जाणे, तसेच महिलांना सक्षम करणे हे आहे. दरम्यान, अंतर योग फाउंडेशनच्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेऊन युवा पिढीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगविद्येचा अंगिकार केला पाहिजे, असे पाटील यांनी यावेळी म्हटले.

अंतर योग फाउंडेशन ही सद्गुरू आचार्य उपेंद्रजी यांनी भारताचा सुवर्णकाळ पुनर्प्रस्थापित करण्याचे महान ध्येय समोर ठेवून स्थापन केलेली, वेगाने वृद्धिंगत होणारी आध्यात्मिक संस्था आहे. आचार्य उपेंद्र जी यांनी कैवल्य ही सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त केली आहे आणि ते जीवन मुक्त सद्गुरू आहेत. २००५ पासून, आपल्या देशाला भारत एक विश्वगुरु आणि महासत्ता बनवण्याच्या उदात्त दृष्टिकोनासाठी अथक आणि निस्वार्थपणे काम करत आहे.

यावेळी अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी तसेच अंतर योग फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.