नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या भूमिकेत होणाऱ्या बदलांवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सविस्तर चर्चा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास संस्था (MSFDA) च्या सादरीकरणासंदर्भात बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीस उपस्थित राहिलो. या बैठकीत संस्थेच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि भविष्यातील उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत प्राध्यापकांच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी MSFDA कडून राबवण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती या बैठकीत देण्यात आली. तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या भूमिकेत होणाऱ्या बदलांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव संतोष खोरगडे, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.