महात्मा फुले यांचे जीवनचरित्र प्रत्येकाला कळावे, यासाठी हा चरित्र ग्रंथ कायमस्वरूपी अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

12

पुणे : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील फुले वाडा येथे जाऊन महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधिमंडळातील आमदार छगन भुजबळ देखील उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महात्मा ज्योतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून प्रकाशित “महात्मा फुले समग्र वाड्मय” पुन:मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन आणि वितरण केले. महात्मा फुले यांचे जीवनचरित्र प्रत्येकाला कळावे, यासाठी हा चरित्र ग्रंथ कायमस्वरूपी अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले कि फुले वाडा याला २०० कोटी रुपये शासनाने देऊनही भूमिअधिग्रहण लवकर होत नाही. मी भुजबळ साहेबाना शब्द देतो कि, १७ तारखेला आपण महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भूसंपादन या विषयांमध्ये काम करायला लावतो आणि भूसंपादन विषयामध्ये नेमकं काय चालू आहे याचा आपण आढावा घेऊ. आणि भूसंपादन पूर्ण करण्याच्या बरोबरीने याच डिझाईन तयार करणं, त्याचं टेंडर डिझाईन करण याची आढावा बैठक घेऊ आणि लवकरात लवकर फुले वाडा, यामध्ये सावित्रीबाईंच स्मारक इथपर्यांतच कॉरिडॉर हे सगळं लवकरात लवकर आपण पूर्ण करू, अशी ग्वाही देखील यावेळी पाटील यांनी दिली.

यावेळी आमदार हेमंत रासने, उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.