डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील निवासस्थानी मोठ्या थाटामाटात साजरी… शहरातील अनेक मान्यवर आणि आंबेडकर प्रेमी मोठया संख्येने उपस्थित

पुणे : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि. १४ एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी ९ ते ११ या संपन्न झाले. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी अनेक मान्यवरांना आग्रहाचे निमंत्रण देखील दिले होते. त्यानुसार आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पाटील यांच्या कोथरुड मधील निवासस्थानी मोठ्या थाटामाटात साजरी झाली. अनेक आंबेडकरप्रेमी मंडळी आवर्जून उपस्थित होती.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना म्हटले कि, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे हे दोन्ही महापुरुष केवळ एका समाजापुरते मर्यादित राहू नयेत, अशी माझी सदैव भावना राहिली आहे. मराठवाडा नामांतर आंदोलनावेळी विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक घरात साजरी झाली पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका असायची. मी सर्व महापुरुषांची जयंती दरवर्षी माझ्या घरी साजरी करतो, असे पाटील यांनी सांगितले.
तसेच पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी समाजातील अनेक मान्यवरांना आमंत्रित केले होते. त्यानुसार आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माझ्या कोथरुड मधील निवासस्थानी मोठ्या थाटामाटात साजरी झाली. अनेक आंबेडकरप्रेमी मंडळी आवर्जून उपस्थित होती. आजचा दिवस माझ्यासाठी एक वेगळाच आनंद देणारा होता, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.