भारतीय जनता पार्टी पुणे शहरची संघटनात्मक बैठक संपन्न… बैठकीत मंडलाध्यक्ष निवड, सक्रीय सदस्य नोंदणी तसेच एकंदरीत पक्ष संघटनावर सविस्तर चर्चा

11

मुंबई : आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिवप्रकाश आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पुणे शहरची संघटनात्मक बैठक पार पडली.

या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भीमरावअण्णा तापकीर, आमदार हेमंत रासने, दिलीपभाऊ कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड.माधवीताई नाईक, मुख्यालय प्रभारी रविजी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, जगदीश मुळीक यांच्यासह पुणे शहर सरचिटणीस उपस्थित होते.

या बैठकीत मंडलाध्यक्ष निवड, सक्रीय सदस्य नोंदणी तसेच एकंदरीत पक्ष संघटनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाच्या सर्वच उपक्रमांत भाजपा पुणे शहर अग्रेसर असून, प्राथमिक सदस्यत्व नोंदणीत आणि सक्रीय सभासद नोंदणीतही भारतीय जनता पार्टी पुणे शहर आघाडीवर आहे. मंडल अध्यक्ष निवडीबाबत सविस्तर चर्चा होऊन सक्रीय सदस्य नोंदणी प्रक्रियेला आणखी गती देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा देखील या बैठकीत करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला मोठा जनाधार मिळाला. भारतीय जनता पार्टीने पश्चिम महाराष्ट्रात प्राथमिक सदस्यत्व नोंदणीतही उत्तम कामगिरी केली असून सक्रीय सभासद नोंदणीतही आघाडी घेतली आहे. सक्रीय सदस्य नोंदणीची प्रक्रिया आणखी प्रभावीपणे आणि वेगाने पूर्ण करण्यासंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.