उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग.दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी करुन घेतला आढावा

68

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ग.दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला. तसेच, उर्वरित कामासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाची मदत घेण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.

याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी आणि गदिमांचे नातू सौमित्र माडगूळकर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आधुनिक वाल्मिकी अर्थात ग.दि. माडगूळकर यांचे मराठी साहित्यात आणि चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान आहे. गदिमांचे साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, यासाठी कोथरुडमध्ये गदिमा स्मारक उभारण्याचा महापालिकेकडून संकल्प करण्यात आला होता. कित्येक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर आता ही वास्तू पूर्णत्वास येत आहे, याचा मनापासून आनंद होतोय. आज या स्मारकाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला. तसेच, उर्वरित कामासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाची मदत घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

कोथरूडमधील महात्मा सोसायटीजवळील सर्व्हे क्रमांक 69-70 हा सुमारे 10 एकराचा भूखंड स्मारकासाठी निश्‍चित झाला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही त्यासाठी मंजुरी दिली. गदिमांच्या शताब्दीला सुरवात होताना कोथरूडमध्ये झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी, स्मारकासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नव्हत्या. त्यामुळे हे स्मारक कागदावरच राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र चंद्रकांत पाटलांनी स्मारकाचं काम एका वर्षात पूर्ण करा, असे आदेश दिले होते, आणि आता ही वास्तू पूर्णत्वास येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.