राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित येण्याच्या विधानावर शिवसेनकडून पहिली प्रतिक्रया, मंत्री भरत गोगावले म्हणाले, त्यांना एकमेकांसाठी पाझर फुटला असेल तर….

127

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या एकाच विषयावर चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. तो विषय म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे वाद किरकोळ आहेत, असे मत व्यक्त केल्याबरोबरच विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरेंनीही अगदी काही वेळात याला प्रतिसाद देत, आपल्याकडून काही भांडणं नव्हती. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत असं मुंबईत जाहीर कार्यक्रमात म्हटलं आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे. या विषयी शिवसेना शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भरत गोगावले म्हणाले, राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा माणूस संध्यकाळी कुठे असेल हे आज कोण बोलू शकणार नाही. राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केलं मला माहिती नाही. ते दोघे भाऊ आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांसाठी पाझर फुटला असेल तर त्याबाबत आम्हाला काही माहित नाही. आम्ही आमचं महायुतीच्या माध्यमातून काम करत आहोत. महायुती आता भक्कम झालेली आहे. महायुतीला आता कोणी छेद देऊ शकत नाही. ते एकत्रित येणार असेल तर आमचं काही म्हणणं नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. आमच्या कामामुळे महायुतीची सत्ता परत आलेली आहे. आता महायुतीला रोखणं कठीण आहे, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. आमच्यातले वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणं, राहणं कठीण नाही, परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही, असं मोठं विधान मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.