ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा वरुणराज भिडे पुरस्कार प्रशांत आहेर आणि मिकी घई यांना जाहीर… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन केले अभिनंदन

10

पुणे : ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा वरुणराज भिडे पुरस्कार प्रशांत आहेर आणि मिकी घई यांना जाहीर झाला. त्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, निवृत्त आयएएस अधिकारी वसंतराव वैद्य, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे, शिवाजी देवकर, बांधकाम व्यावसायिक भारत देसडला, डॅाक्टर पद्माकर पंडीत, डॅा. विश्वंभर चौधरी, मंगेश गोळे, विश्वनाथ देवकर, ‘मुंबई तक’चे अभिजीत कारंडे, संदीप कोतकर उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार यंदा ‘लोकमत’चे विशेष वार्ताहर यदु जोशी यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच ‘महाराष्ट्र टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांना आश्वासक पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यांच्यासह ‘लोकसत्ता’चे सांगली प्रतिनिधी दिंगबर शिंदे (ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार) आणि ‘एबीपी माझा’चे पुणे प्रतिनिधी मिकी घई यांनाही इलेक्ट्रॉनिक माध्यम पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण २८ एप्रिल रोजी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.

हा पुरस्कार समारंभ वरुणराज भिडे मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आला आहे. मुख्य पुरस्कार म्हणून २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह दिले जाते. तर आश्वासक पत्रकार पुरस्कार म्हणून १० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह दिले जाते. यावर्षी या पुरस्काराचे २३वे वर्ष आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.