अमित शाह फेल होम मिनिस्टर, अपशकुनी, देश त्यांचा राजीनामा मागतोय; पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून खासदार संजय राऊत यांचे टीकास्त्र

155

मुंबई : पहलगाममध्ये झालेल्या कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांनी काल जम्मू काश्मीर येथे असलेल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करून हल्ला केला. हल्ला करताना मुस्लिम आहात का? अशी विचारणा करून टार्गेटेड पद्धतीने हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा थेट राजीनामाच मागितला.

संजय राऊत यांनी म्हटले कि, राजीनामा द्या ! संपूर्ण वेळ सरकार बनवण्यात आणि पाडण्यात जातो! 365 दिवस मन राजकीय विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र करण्यात व्यस्त आहे. लोकांची सुरक्षा राम भरोसे ! आता राम पण कंटाळला आहे ह्या लोकांवर! कृपया राजीनामा द्या. देशावर दया करा, असे राऊत यांनी म्हटले. राऊत म्हणाले कि, सैन्यात 2 लाख पदं रिक्त आहेत. डिफेन्स बजेटमध्ये कपात केली जातेय. लाडकी बहिण सारख्या योजनेला पैसा वळवला जातो. सुरक्षा व्यवस्थेशी खेळतात. नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असं सांगितलं जात होतं, पण उलट दहशतवाद वाढतोय. संसदेत खोटं सांगितलं जातं. या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह जबाबदार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

राऊत पुढे म्हणाले कि, देशात द्वेष पसरवण्याच काम सुरु आहे. त्याचा हा परिणाम आहे. हे लोक मोठमोठ्या गोष्टी बोलतात. 56 इंचाची छाती कुठे गेली. आक्रोश पाहा. नवीन लग्न झालेलं. तिच्यासमोर पतीची हत्या झाली. कोण जबाबदार? अमित शाह सारखे लोक 24 तास सरकार बनवण्यात, सरकार पाडण्यात व्यस्त असतात, तर हे लोक जनतेशी सुरक्षा कशी करणार?. अमित शाह फेल होम मिनिस्ट आहेत. सगळा देश त्यांचा राजीनामा मागतोय. अमित शाह फेल, अपशकुनी आहेत. अमित शाह पेहेलगामला गेले काही मेहेरबानी केली नाही. 27 लोकांच्या मृत्यूला ते जबाबदार आहेत, अशी जोरदार तिला संजय राऊत यांनी केली.

राऊत यांनी पुलवामा घटनेची आठवण करून देत म्हटले कि, पुलवामानंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये झाला आहे. पुलवामामध्ये 40 जवान मारले गेले. ती सुरक्षेत चूक होती. ते रहस्य आहे, त्यामागे कोण होतं, ते शेवटपर्यंत समजलं नाही. पुलावामाचा राजकीय फायदा मोदी सरकारने घेतला. काल पर्यटक मारले गेले. महाराष्ट्रातील सहा लोक आहेत. 370 कलम हटवलं. त्यानंतर जम्म-काश्मीर केंद्र शासित केलं. म्हणजे केंद्राच पूर्ण नियंत्रण रहावं. जे काल झालं, त्याची सगळी जबाबदारी केंद्र सरकारची आहे. का झाली ही घटना? गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे, अशा कणखर शब्दात राऊत यांनी निषेध व्यक्त केला. तसेच ते पुढे म्हणाले, हा टूरिस्ट सीजन आहे, दोन ते तीन हजार पर्यटक होते. एकही पोलीस तिथे नव्हता. श्रीनगरला अमित शाह उतरले. त्यांच्या सुरक्षेसाठी जवळपास 75 कारचा ताफा होता. 500 पेक्षा जास्त पोलीस होते. बॉम्बस्कॉड होतं. मात्र सामान्य व्यक्तीसाठी, जनतेसाठी कोणी नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.