काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

56

मुंबई, २४ एप्रिल : काश्मिरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर मेहनत घेत आहे. त्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडलेली आहे. हि माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पाटील यांनी सांगितले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज २ विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान ८३ पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने १००, असे महाराष्ट्रातील एकूण १८३ पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.