‘कमळ’ हीच भाजपा परिवाराची खरी ओळख – रवींद्र चव्हाण

पुणे : भाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत गाव वस्ती संपर्क अभियानाच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर जिल्हा विभागांची आढावा बैठक काल पुण्यामध्ये शुभारंभ लाँन्स येथे संपन्न झाली. या बैठकीला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली.
यावेळी मार्गदर्शन करताना ” ‘कमळ’ हीच भाजपा परिवारातील प्रत्येकाची खरी ओळख आहे, त्यामुळे उद्यापासून सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कमळ लावायला सुरुवात करुया. यामुळे आपले पदाधिकारी व कार्यकर्ते जिथे जिथे जातील, तिथले वातावरण भाजपमय होईल, असा विश्वास चव्हाण व्यक्त केला.
याप्रसंगी आ. हेमंत रासने, आ. शंकर जगताप, आ. राहुल कुल, आ. भीमराव तापकीर, आ. महेश लांडगे, आ. योगेश टिळेकर, आ. उमाताई खापरे, आ. अमित गोरखे, मा. खा. रणजित निंबाळकर, मा. राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संघटन मंत्री रवि अनासपुरे, मकरंद देशपांडे, धीरज घाटे यांच्यासह या विभागातील जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.