मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेले पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी भेट देऊन दोघांनाही वाहिली श्रद्धांजली

11

पुणे : पहलगाममध्ये झालेल्या कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाला. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेले पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी भेट देऊन दोघांनाही श्रद्धांजली अर्पण केली.

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी भेट देऊन चंद्रकांत पाटील यांनी दोघांनाही श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून मन हेलावून गेलं, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरपणे पर्यटकांना लक्ष्य केलंय, त्यामुळे संपूर्ण देशच नव्हे; तर जगभरात संतापाची लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अतिशय संवेदनशील नेतृत्व आहेत.‌ या घटनेचे गंभीर परिणाम दहशतवादी आणि त्यांना बळ देणाऱ्यांना भोगावेच लागतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेजण फार जवळचे लहानपणापासूनचे मित्र होते. मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. दोघांचेही पार्थिव त्यांच्या पुण्यातील घरी आणण्यात आले. गुरुवारी पुण्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.