भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने पुण्यातील केसरीवाडा ते शनिवारवाडा अशा शोभायात्रेचे आयोजन… चंद्रकांत पाटील यांची शोभायात्रेत प्रमुख उपस्थिती

पुणे : भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने पुण्यातील केसरीवाडा ते शनिवारवाडा अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन भगवान परशुरामांना वंदन केले. यावेळी पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, या हल्ल्यामुळे ‘एक है तो सेफ हैं’ चे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी एकाजुटीने राहिले पाहिजे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी केसरीवाड्यात देखील पाटील यांनी भेट दिली. टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी पाटील यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली.
यावेळी खा. मेधाताई कुलकर्णी, भाजपा सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह शहरातील विविध ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.