पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा “मन की बात” कार्यक्रम कोथरूडमध्ये नामदार चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क कार्यक्रमात ऐकवण्यात आला

37

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा “मन की बात”उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील पंडित दीनदयाळ शाळेत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क कार्यक्रमात ऐकवण्यात आली. यावेळी माननीय मोदीजींनी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच विविध क्षेत्रात देशाच्या प्रगतीची माहिती दिली.

पंतप्रधानमोदी जी यांनी या संवादात दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचा संकल्प संपूर्ण देशासमोर स्पष्ट शब्दांत मांडला. तसेच, देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची आणि यशोगाथांची माहितीही देशवासियांसमोर मांडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय देणार असल्याचे सांगितले.

या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला अधिक दृढ निर्धार करावा लागेल. काश्मीरमध्ये शांतता परतत होती. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य येत होते. बांधकाम कामांना अभूतपूर्व गती मिळाली होती. लोकशाही मजबूत होत होती. पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती. लोकांचे उत्पन्न वाढत होते. तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. पण हेच देशाच्या शत्रूंना आणि जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना आवडले नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे. म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे, असे आज मोदी म्हणाले.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थितीत होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.