मोरया गोसावी मंदिराजवळ उद्यानात दोन बुरखाधारी महिलांकडून नमाज पठण, हिंदू कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण व शिववंदना पठण

चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराचे एक आध्यात्मिक शक्ती केंद्र आणि वैभव म्हणजे मोरया गोसावी गणेश मंदिर. श्री मोरया गोसावी महाराजांची समाधी देखील या ठिकाणी आहे. असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात. या मोरया गोसावी मंदिराच्या परिसरामध्ये असणाऱ्या जिजाऊ पार्वती उद्यानामध्ये दोन बुरखा धारी स्त्रियांनी येऊन नमाज पठण केल्याचे निदर्शनास आले आहे. मंदिराच्या पासून हाकेच्या अंतरावर मशीद असताना देखील या महिलांमार्फत केलेल्या या कृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होताच हिंदू संघटनांनी त्वरित तेथे जाऊन त्याजागी गोमूत्र शिंपडून शुद्ध करण्यात आल्याचे सांगितले तसेच तेथे शिव वंदननाचे पठण देखील करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
हाकेच्या अंतरावर मशिद आहे पण यांना नमाज पठण मोरया गोसावी मंदिराजवळ करायचे आहे. ही सुरवात आहे. आधी 1 ते 2 बायकांना पाठवून अंदाज घ्यायचा व हळूहळू संख्या वाढवत जायची व एक दिवस तिथे मजार बांधून दावा करायचा. आज फक्त दोन बुरखा धारी स्त्रियांनी येऊन नमाज पाडला. उद्या टोळीने येऊन नमाज पाडतील, थडगे बांधू पाहतील,इफ्तार साजरे करतील.पण आम्ही ते होऊ देणार नाही. सर्व मनसुबे उधळून लावू. हिंदूंना गृहीत धरण बंद करा. #एक_है_तो_सेफ_है माझ्या मोरयाचा धर्म जागो म्हणत पुण्यात सारस बाग येथे जे घडतंय ते चिंचवडगावात आम्ही कदापि होऊ देणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया भारतीय सनातनी हिंदू कार्यकर्ते निरंजन कुलकर्णी वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देण्यात आली आहे.
या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांनी लवकरात लवकर लक्ष घालून कारवाई करणे अपेक्षित आहे. भविष्यात असे प्रकार घडून शहरातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रशासन निश्चितच पार पडेल हि आशा पिंपरी चिंचवडकरांकडून व्यक्त केली जात आहे.