कोथरुडपासून निसर्गछायाकडे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ संपन्न

पुणे : आपल्या प्रिय ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आश्रयस्थान, काळजी आणि विचारशीलतेने सजलेले असे स्थान म्हणजे निसर्ग छाया. या सुंदर उपक्रमाचे बीज उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोवले. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी खास करण्याची तीव्र इच्छा होती. त्यांचे स्वप्न असे होते की एक असे संगोपनाचे ठिकाण निर्माण करावे जिथे वृद्धांना सांत्वन, हास्य आणि प्रेमाचे क्षण मिळतील. यासाठी त्यांनी निसर्ग छाया उभारलं. येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आता पाटील यांनी आणखी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे ते म्हणजे, कोथरुडपासून निसर्गछायाकडे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. सोमवारी या सेवेचा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले , कोथरूड मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेल्या निसर्ग छाया उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत असंख्य कोथरुडकरांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आता कोथरुडपासून निसर्गछायाकडे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करुन देताना मला प्रचंड आनंद होत असल्याचे पाटील म्हणाले. पाटील यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.
निसर्ग छाया हे फक्त एक ठिकाण नाही; ते वृद्धांसाठी अशी जागा जिथे वेळ मंदावतो, त्यांना मित्रांच्या सहवासात रमण्याची आणि नित्यक्रमातून सुटका मिळवण्याची संधी मिळते.