सांगलीतील प्रथितयश व्यापारी व उद्योजक अरुण रंगनाथ दांडेकर यांचे निधन… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त करत वाहिली श्रद्धांजली

सांगली : सांगलीतील प्रथितयश व्यापारी व उद्योजक तसेच सांगलीतील विविध सामाजिक, सहकारी, शैक्षणिक, आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक संस्थांमध्ये कार्यरत असणारे अरुण रंगनाथ दांडेकर यांचे निधन. वयाच्या ७५ व्या वर्षी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाश्च्यात पत्नी मुले, सुना, नातवंड, बंधू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, सांगलीतील प्रथितयश व्यापारी व उद्योजक तसेच सांगलीतील विविध सामाजिक, सहकारी, शैक्षणिक, आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक संस्थांमध्ये कार्यरत असणारे अरुणदादा दांडेकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. दांडेकर कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो अशी प्रार्थना पाटील यांनी केली.
ब्राम्हण नागरी पतसंस्थेची त्यांनी स्थापना केली. चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्येही ते नेहमीच सक्रिय असायचे. सांगलीत रोटरी क्लबच्या उभारणीत आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार होता. विशवजागृती मंडळाच्या वतीने त्यांनी सांगली भूषण पुरस्कार सुरु केला. सांगली जिल्ह्याचे नाव मोठे करण्यात ज्यांनी योगदान दिले अशांचा सन्मान करण्याचा पुढाकार त्यांनी घेतला. मृत्यूपश्चात नेत्रदान आणि त्वचादान करण्याचा संकल्प त्यांनी घेतला होता.