चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील गोसावी वस्तीतील आरती बल्लाळ आणि साक्षी अडागळे यांच्या लग्नासाठी मदत म्हणून ‘झाल’ देऊन त्यांना वैवाहिक जीवनासाठी दिल्या शुभेच्छा

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. नागरिकांच्या मागणीनुसार ते मदतकार्य करत असतात. कोथरूडमधील लेकींसाठी देखील त्यांनी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. आर्थिक दुर्बल कुटुंबातील लेकींच्या लग्नकार्यात मदतीचा हात देखील त्यांनी पुढे केला आहे. चंद्रकांत पाटील कोथरूडमधील अनेक मुलींना वैवाहिक जीवनासाठी मदत म्हणून ‘झाल’ देऊन त्यांच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी झाले आहे. आजही त्यांनी कोथरूडमधील गोसावी वस्तीतील आरती बल्लाळ आणि साक्षी अडागळे (सुतारदरा) यांच्या लग्नासाठी मदत म्हणून ‘झाल’ देऊन त्यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, लग्न हा कुठल्याही मुलीच्या आयुष्यातला एक फार मोठा टप्पा असतो. आपल्या लेकीचा संसार सुखाचा आणि आनंदाचा व्हावा; ही प्रत्येक वडिलांची अपेक्षा असते. त्यामुळे लग्नानंतर तिची पाठवणी करताना संसारोपयोगी वस्तू देण्याची आपली परंपरा आहे. आर्थिक दुर्बल कुटुंबात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू होताच; अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोथरूड मधील प्रत्येक लेख ही माझीच लेक आहे. त्यामुळे तिची सन्मानाने पाठवणी व्हावी, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून आर्थिक दुर्बल कुटुंबातील लेकीसाठी झाल देऊन; तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होत असतो, असे पाटील यांनी म्हटले. कोथरूडमधील गोसावी वस्तीतील आरती बल्लाळ आणि साक्षी अडागळे (सुतारदरा) हिचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे आज तिला ‘झाल’ देऊन वैवाहिक जीवनासाठी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.