‘भारत केसरी 2025’ कुस्ती स्पर्धेमध्ये कुमारभारत केसरी हा किताब पटकावणारा मल्ल विराज रानवडे याची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन केले अभिनंदन

पुणे : हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे संपन्न झालेल्या ‘भारत केसरी 2025’ कुस्ती स्पर्धेमध्ये औंध कुस्ती केंद्रातील मल्ल विराज रानवडे याने कुमारभारत केसरी हा किताब पटकविला. त्याबद्दल आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विराजचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर देखील उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान त्यांनी ‘भारत केसरी 2025’ कुस्ती स्पर्धेमध्ये औंध कुस्ती केंद्रातील मल्ल विराज रानवडे याची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
विराज रानवडे हा औंध कुस्ती केंद्र मध्ये वस्ताद विकास रानवडे यांच्याकडून कुस्तीचे धडे घेत आहे. पैलवान विराज रानवडे याने या आधी देखील राष्ट्रीय पातळीवर अनेक किताब पटकविले आहेत . यामध्ये खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेमध्ये त्याने सिल्वर मेडल मिळवले होते तसेच स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये देखील त्याने सिल्वर मेडल व गोल्ड मेडल, पुणे महापौर केसरी किताब तसेच अनेक स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी करत अनेक गदा व पदके मिळवली आहेत. विराज हा सलग तीन वर्षे ऑलइंडिया युनिव्हर्सिटी ,भोजपुरी केसरी , इंटर नॅशनल कुस्ती दंगल या स्पर्धांमध्ये खेळून पुणे जिल्ह्याला अनेक वेळा मेडल मिळवून दिली आहेत.