महाराष्ट्राची न्यायाधीशांची समृद्ध परंपरा न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या रूपाने पुढे सुरु राहील याची खात्री – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

79

मुंबई : महाराष्ट्रातील अमरावतीचे सुपुत्र, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. महामहीम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू जी यांनी न्यायमूर्ती गवई यांना शपथ दिली. न्यायमूर्ती गवई यांच्या सरन्यायाधीश पदाच्या कारकिर्दीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणं, महाराष्ट्रासाठी हा क्षण खूप अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. महाराष्ट्राची न्यायाधीशांची समृद्ध परंपरा न्यायमूर्ती गवई यांच्या रूपाने पुढे सुरु राहील याची खात्री आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. न्यायमूर्ती गवई यांच्या सरन्यायाधीश पदाच्या कारकिर्दीला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे पाटील यांनी म्हटले.

आपल्या वडिलांकडून सामाजिक कार्याचा वसा घेतलेले न्या. भूषण गवई सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा भाग होते. ज्याद्वारे अनेक चांगले ऐतिहासिक निकाल त्यांनी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्या. गवई यांनी “महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ” नागपुरात स्थापन व्हावे यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. विविध न्यायालयांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीही त्यांचे विशेष योगदान आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.