आगामी पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कामकाजाचा घेतला आढावा

148

मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आढावा घेतला. विधानभवनात झालेल्या बैठकीत सचिव व संबंधित अधिकाऱ्यांसोबत विविध शाखांचं काम, समित्यांची तयारी आणि अधिवेशनातील सादरीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामकाज सुरळीत होण्यासाठी नियोजन योग्य करण्याच्या सूचना दिल्या.

विधानभवनात पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारी संदर्भात आढावा झाली. यावेळी सचिव जितेंद्र भोळे, सचिव मेघना तळेकर, सचिव  श्री आठवले,  शिवदर्शन साठ्ये, सहसचिव नागनाथ थेटे, उपसचिव रविंद्र जगदाळे, अवर सचिव सीमा तांबे, अवर सचिव आशिष जावळे उपस्थित होते.

आढावा बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी शाखानिहाय कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच विनंती अर्ज समिती व सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवणे तदर्थ समिती कामाचाही आढावा घेतला. लोकशाही प्रक्रियेला गतिमान ठेवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे बनसोडे यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.