कोथरूडमध्ये “ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमाचा समस्त कोथरूडवासियांनी लाभ घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील

20

पुणे : पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना हिसका दाखवला. भारताच्या सामर्थ्याचे विराट दर्शन जगाला झाले. या निमित्ताने युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर -नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाचा समस्त कोथरूडवासियांनी लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती केली.

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर हे माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आणि माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांची मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि मुलाखत संपन्न होणार आहे. विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा समस्त कोथरूडवासियांनी लाभ घ्यावा,असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट करत केले आहे.

शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.