बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या अपघाती निधनाने बीडच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

78

पुणे : बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील दुःख व्यक्त करत माजी आमदार आर. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय वेदना देणारे आहे. सामान्य कार्यकर्ता ते विधानसभेत भाजपाचे आमदार असा स्वप्नवत प्रवास त्यांनी केला तो अफाट जनसंपर्कामुळेच. त्यांच्या अपघाती निधनाने बीडच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आर. टी. देशमुख यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूलवरून जात असताना आर टी देशमुख यांची गाडी घररुन सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली. त्यात माजी आमदार आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले. परंतु उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आरटी देशमुख हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार बनले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांनी तीन टर्मचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांचा ३७ हजार २४५ मतांनी पराभव केला. मुंडे समर्थक नेते म्हणून त्यांची ओळख होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.