नामदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कसबा मतदारसंघातील नवनियुक्त मंडळ अध्यक्षांच्या घरी दिली सदिच्छा भेट

पुणे, २९ मे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कसबा मतदारसंघातील नवनियुक्त मंडळ अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे आणि प्रशांत सुर्वे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, संकेत थोपटे यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
भारतीय जनता पक्ष ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर लाखो कार्यकर्त्यांचे कुटुंब आहे. या कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, त्यांची विचारपूस करणारे नेते म्हणजे चंद्रकांत पाटील .पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची घेतलेली भेट ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर एका कुटुंब सदस्याप्रमाणे आपल्या घरातील सदस्यांची त्यांनी विचारपूस केली. यावेळी प्रत्येक घरात त्यांचा सन्मान आणि आदरातिथ्य करण्यात आले. हे आदरतिथ्य पाहून भारावून गेलो असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
आ. हेमंत रासने, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, कसबा मंडल माजी अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.