महाराष्ट्राने गेल्यावर्षीचा तुलनेत 32 टक्के गुंतवणूक अधिक आकर्षित केली… विक्रमी गुंतवणूकीबद्दल महाराष्ट्राचे हार्दिक अभिनंदन! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

20

मुंबई : 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) आकडेवारी प्रसिद्ध झाली असून गेल्या वित्तीय वर्षात महाराष्ट्राने 1 लाख 64 हजार 875 कोटी रुपये इतकी विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण विदेशी गुंतवणुकीच्या तब्बल 40 टक्के आहे. यावर्षी देशात आलेली एकूण विदेशी गुंतवणूक ही 4 लाख 21 हजार 929 कोटी रुपये इतकी आहे. महाराष्ट्राने गेल्यावर्षीचा तुलनेत 32 टक्के गुंतवणूक अधिक आकर्षित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या उद्योगस्नेही धोरणाना विदेशी गुंतवणूकदारानी दिलेला हा सकारात्मक प्रतिसाद आहे. या विक्रमी गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, महायुती सरकार आणि समस्त महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी तब्बल 40 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गत आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च 2025) शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील 10 वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मागील दशकातील परकीय गुंतवणुकीचा आढावा (कोटी रुपयांमध्ये) :

2015-16 : 61,482 कोटी

2016-17 : 1,31,980 कोटी

2017-18 : 86,244 कोटी

2018-19 : 57,139 कोटी

एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी

2020-21 : 1,19,734 कोटी

2021-22 : 1,14,964 कोटी

2022-23 : 1,18,422 कोटी

2023-24 : 1,25,101 कोटी

2024-25 : 1,64,875 कोटी

Get real time updates directly on you device, subscribe now.