मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त “युवा प्रेरणा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त “युवा प्रेरणा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राजमाता अहिल्यादेवी यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा युवा मोर्चाने काम करावे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
यावेळी आमदार शंकरभाऊ जगताप, योगेश टिळेकर, विक्रांत पाटील, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष करण मिसाळ, यांच्यासह इतर मान्यवर आणि युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर या एक अत्यंत दूरदृष्टी असलेल्या, नीतिमान व कर्तव्यनिष्ठ प्रशासिका होत्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी वाहून घेतले. शासन, समाज व संस्कृती यांचा उत्तम समन्वय साधणाऱ्या या महान राजमातेचा आदर्श नव्या पिढीपुढे ठेवण्याच्या उद्देशाने हा संवाद आयोजित करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला आणि अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित युवतींची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली आणि विजेत्या स्पर्धकाला सन्मानित करण्यात आले – या सर्व गोष्टींनी कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली!
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित तरुणांशी थेट संवाद साधत, अहिल्यादेवींच्या विचारांवर भाष्य करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. फडणवीस म्हणाले, देशाला एकसंध ठेवणाऱ्या शक्तिस्थळांवर परकीय आक्रमणे करून ती उध्वस्त केली. परंतु अहिल्यादेवी या अशा एकच शासक होत्या, त्यांनी २८ वर्षांच्या कारभारात तळागाळातील लोकांचा उत्कर्षाचा प्रयन्त केला. न्यायदान ,जलसंधरण, एक कर पद्धती, शेतकऱ्यांना संरक्षण अशा विविध क्षेत्रात काम केले. देशात महिला सैनिकांची पहिली तुकडी त्यांनी उभी केली. हिंदू धर्मांची प्रतीके असलेले घाट , बारा ज्योतिर्लिंग , शक्तीस्थळे, यांचे पुनरुज्जीवन केले, म्ह्णून ३०० वर्षांनंतरही त्यांचे नाव आणि त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली जात आहे, असे फडणवीस म्हणाले.