पुण्यात निसर्गछाया ज्येष्ठ नागरिक महामेळाव्याचे आयोजन… महामेळाव्याचा समस्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : येत्या 3 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ ते ५ या वेळेत निसर्गछाया ज्येष्ठ नागरिक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा समस्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने, मंदार आणि अमृता देवगांवकर यांनी या मनोरंजन सेवा प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पंडीत फार्म, डी पी रोड येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी ९ ते ९.३० या वेळेत हास्ययोग शिबीर, सकाळी १०.०० ते १२.३० सुरेल मैफिल तसेच दुपारी ३ ते ५ या अवधीत मजेदार खेळ होणार आहेत. तसेच ज्येष्ठांना आवश्यक सोयीसुविधांचे विविध स्टॉल हे या उपक्रमाचे वैशिष्टय असणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या मेळाव्यासाठी प्रवेश हा विनामूल्य असणार आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून निसर्गछायाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सेवेसाठी पाटील सदैव तत्पर असतात. नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे निसर्गछाया. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महामेळाव्याचा समस्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा,अशी विनंती पाटील यांनी केली आहे.