“निसर्गछाया” उपक्रमाने लाभार्थ्यांचा दहा हजारचा टप्पा पूर्ण केल्याने स्नेहमेळाव्याचे आयोजन…कोथरुडसह इतरांनाही याचा लाभ घेता येईल – नामदार चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या “निसर्गछाया” उपक्रमाने लाभार्थ्यांचा दहा हजारचा टप्पा नुकताच पूर्ण केला. त्या अनुषंगाने कोथरुड मधील पंडित फार्म येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला होता. मात्र, अल्पवधीत हा उपक्रम अतिशय लोकप्रिय झाला. गेले डिड वर्ष ते कोथरूड पर्यंत मर्यादित होत. आता या उपक्रमाचा प्रतिसाद पाहता, कोथरुडसह इतरांनाही याचा लाभ घेता येईल, अशी घोषणा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. यासोबतच चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, इथे आता अशी व्यवस्था आपण करू कि ज्यांची मुलं ५-६ महिन्यांसाठी कुठे बाहेरगावी जाणार असतील तर त्यांच्या आईवडिलांना राहण्याची सोय आपण इथे सुरु करणार आहोत. या स्नेह मेळाव्याला ज्येष्ठ नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा मनसोक्त आनंद लुटला.
यावेळी पाटील यांनी विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. ३० मे रोजी ऑपरेशन सिंदूर वर झालेली प्रकट मुलखात हा महत्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर आता ८ जून रोजी फिरते वाचनालय यासंबंधित कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी संत पाद्य पूजन कार्यक्रम, आणि वारकऱ्यांना उपयुक्त वस्तू वाटप करण्यात येणार आहे. सुखदा उपक्रम म्हणजेच गरोदर महिलांसाठी डिलिव्हरी पॅकेज आपण सुरु केले. या डिलिव्हरी झालेल्या महिलांचे , त्यांची मुलं आणि परिवारातील सदस्यांचे ११ जून रोजी गेटटुगेदर आयोजित करण्यात येणार आहे. याकार्यक्रमात डिलिव्हरी नंतर घेण्याची काळजी, गर्भसंस्कार, यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच पाटील यांनी सुरु केलेला मानसी उपक्रमातील १५ ते २० वयोगटातील मुलींना रोज योगा मोफत, खाणं मोफत, आरोग्य तपासणी मोफत, दर महिन्याला एक सिनेमा मोफतदेण्यात येते. या उपक्रमातील मुली – महिला अशा एकूण ८५० जणी योगा करणार आहेत. २१ जून रोजी योग दिनाला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली.
व्यासपीठावर सौ. अंजली पाटील, निसर्गछाया उपक्रमाचे संयोजक मंदार देवगावकर, अमृता देगावकर, नवचैतन्य हास्य योगचे मकरंद टिल्लू, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.