डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथील विविध प्रशासनिक व शैक्षणिक विषयांवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित बैठक संपन्न

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (ता. माणगाव, जि. रायगड) येथील विविध प्रशासनिक व शैक्षणिक विषयांवर आज मंत्रालयातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पाटील यांनी उपस्थित राहत मार्गदर्शन केले.
या बैठकीमध्ये विद्यापीठाचा विकास, शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधा, विद्यार्थी कल्याण आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय विद्यापीठाच्या प्रगतीसाठी निश्चितच दिशादर्शक ठरतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल बी. रेड्डी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर तसेच उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.