‘ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग’ पद्धतीच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात येणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणीबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेत सविस्तर चर्चा केली. या बैठकीत ‘ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग’ (Activity-Based Learning) पद्धतीच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणाऱ्या या पद्धतीमुळे त्यांच्या ज्ञानात आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होत असल्याचे यावेळी प्राचार्यांनी सांगितले. या बैठकीत उपस्थित अनेक प्राचार्यांनी या बाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून, नव्या धोरणामुळे शिक्षणपद्धतीत आलेले बदल विद्यार्थी-केंद्रित व गुणवत्तापूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल बी. रेड्डी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर आणि उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.