सनी निम्हण आणि मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्राकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

12

पुणे : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज कोथरूडमधील सोमेश्वरवाडी येथे सनी दादा निम्हण आणि मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्राकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते अतिशय उत्साहात पार पडले.

आज एक हजार एकशे चार रक्त दत्त्यांनी रक्तदान केले, अतिशय नेटक नियोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पाटील यांनी येथे उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक सनी निम्हण, भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.