भाजप पुणे शहर उपाध्यक्ष मंदार बलकवडे यांच्या पुढाकाराने ॲम्ब्यूलन्स लोकार्पण सोहळ्याचे आयोजन… समाजाची गरज ओळखून राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमासाठी नामदार चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांचे केले अभिनंदन

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात, देशप्रेमी मित्र मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पुणे शहराचे उपाध्यक्ष मंदार बलकवडे यांच्या पुढाकारातून कै. अनिलभाऊ बलकवडे आणि विजयदादा धापसे यांच्या स्मरणार्थ एक रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी, गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘वही महोत्सव’ देखील आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप तसेच स्कुल बॅग वाटप करण्यात आले. समाजाची गरज ओळखून राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमासाठी मंदार बलकवडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
कार्यक्रमास दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.