छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारोहण सोहळा या ऐतिहासिक आणि शुभ दिनाच्या औचित्याने, ‘गोष्ट इथे संपत नाही’ हा कथाकथन कार्यक्रम नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

13

पुणे : इतिहासाच्या गर्भातून काही वज्रलेख असे कोरले गेले आहेत की, ते संपूर्ण राष्ट्रासाठी अक्षय आणि चिरंतन प्रेरणेचे स्रोत ठरतात. असा एक अपूर्व, मांगल्यपूर्ण आणि तेजस्वी क्षण शालिवाहन शके १५९६, आनंद नाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी हिंदुस्थानच्या इतिहासात कोरला गेला तो म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारोहण सोहळा! याच ऐतिहासिक आणि शुभ दिनाच्या औचित्याने, कोथरुड येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अमित तोरडमल यांच्या संयोजनातून ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांनी आपल्या प्रभावी निवेदनातून छत्रपती शिवरायांच्या चरित्रातील प्रेरणादायी क्षण पुन्हा उलगडले. या विशेष प्रसंगी उपस्थित राहून पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.