स्वयंचलित आरोग्य तपासणी यंत्राचा लोकार्पण सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने, तसेच फिनिक्स मायक्रोसिस्टिम्सच्या संयोजनातून नागरिकांसाठी जलद, सोयीस्कर आणि डिजिटल पद्धतीने प्राथमिक आरोग्य तपासणी करता येईल, अशी स्वयंचलित आरोग्य तपासणी यंत्रणा नुकतीच कसबा भागात कार्यान्वित करण्यात आली असून त्याचे लोकार्पण आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी सुलभ पर्याय उपलब्ध होणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरी आरोग्य सेवा अधिक प्रभावी बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.
आमदार हेमंत रासने प्रतिष्ठान आणि फिनिक्स मायक्रोसिस्टम्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा प्रधानमंत्री भारतीय जन औषधे केंद्र, सदाशिव पेठ पुणे ३० या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार हेमंत रसाने यांनी यावेळी केले.
या यंत्रणेच्या लोकार्पणप्रसंगी आमदार हेमंत रासने, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, कसबा मंडलाचे माजी अध्यक्ष राजेंद्र काकडे, अनिल बेलकर आणि भाजपचे इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.