सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुलंच्या नावाने विशेष अध्यासन करण्याचा मानस – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पु. ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ग्लोबल पुलोत्सवचे उदघाटन सोमवारी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
पु. ल. देशपांडे यांचे शाश्वत स्मारक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या नवे अध्यासन सुरु करावे, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात घोषणा केली कि, लवकरच हे अध्यासन सुरु होईल. येत्या वर्षभरातच पहिला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याचा प्रयत्न करू असे पाटील यांनी यावेळी आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले पुण्यात ग.दि. माडगूळकर यांचे देखणे स्मारक उभे केले जात असून आर. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे सुंदर कलादालन बाणेरला आहे. पुलंच्या अध्यशनची रचना तज्ज्ञांशी बोलून निश्चित केली जाईल. जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे, त्या प्रत्येक ठिकाणी ग्लोबल पुलोत्सवाचे कार्यक्रम केले जातील असे पाटील म्हणाले.
यावेळी दिवंगत गायिका प्रभा अत्रे यांना जाहीर झालेला “पु. ल. कृतज्ञता” पुरस्कार त्यांच्याशी संबंधित भारती एमडी आणि प्रसाद भेडसावळे यांना सुपूर्द करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुलंच्या नावाने विशेष अध्यासन करण्याचा मानस यानिमित्ताने व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, पुलंचे मेहुणे मोहन ठाकूर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्हचे सुशील जाधव, ग्लोबल पुलोत्सव समितीचे विरेंद्र चित्राव, सतीश जकातदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.