‘सुखदा’ उपक्रमामुळे कोथरुडमधील माझ्या लेकींचं बाळंतपण सुखरूप पार पडतंय, हे पाहणं ही माझ्यासाठी एक वेगळीच समाधानाची भावना – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उप्रक्रम पुण्यात आयोजित करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर वर झालेली प्रकट मुलखात, फिरते वाचनालय संबंधित कार्यक्रम, संत पूजन आणि वारकरी साहित्य वाटप यासारखे विविध उपक्रम राबविले गेले. यासोबतच आज त्यांच्या सुखदा या उपक्रमाची माहिती देणारा आणि या उपक्रमातील महिलांचा सन्मान करणारा एक छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. सुखदा मधील महिला त्यांची मुले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचे एक गेटटुगेदर यावेळी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील वस्ती भागातील महिलांचा गरोदरपणाचा काळ आनंदात जावा, त्यांच्या मातृत्वाच्या आनंदात पैशांअभावी कोणतीही अडचण येऊ नये; त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन आणि वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी ‘सुखदा’ या उपक्रमाची सुरुवात चंद्रकांत पाटील यांनी केली. या डिलिव्हरी झालेल्या महिलांचे , त्यांची मुलं आणि परिवारातील सदस्यांना आज एकत्रित आणण्यात आले. याकार्यक्रमात डिलिव्हरी नंतर घेण्याची काळजी, गर्भसंस्कार, डिलिव्हरीनंतर करण्यात येणारी योगासने , आहाराची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पाटील यांच्या सुखदा उपक्रमातील संपूर्ण टीमचा सन्मान करण्यात आला.
चंद्रकांत पाटील यावेळी आपल्या घराची परिस्थिती सांगितली. लहानपानापासूनच चांगलं काम करण्याची सवय लागली असल्याचे त्यांनी सांगितले. एका गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून सुरुवात करत हळूहळू व्याप वाढत गेला. आमदार झालो, मंत्री झालो. वृत्ती हि घेण्याची नाही तर देण्याची झाली. अपेक्षा नसताना काम कारण हा माझा स्वभाव असल्याचे ते म्हणाले.
पाटील सुखदा उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले कि, जन्म घेणार मूल हे जन्मतःच चांगलं जन्मावं यासाठी हा आटापिटा आहे. तब्येतीने सुधृढ, बुद्धीने तल्लख , चांगले संस्कार असलेले बाळ, म्हणजेच एकूणच या देशामध्ये चांगली पिढी घडविण्यासाठी हा प्रयन्त असल्याचे पाटील म्हणाले. यासाठी या उपक्रमामुळे १४५ महिलांची यशस्वी प्रसूती होऊन त्यांना मातृत्वाचा आनंद मिळत आहे. त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी “सुखदा” परिवाराचा आनंदोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या सर्व मातांनी दिलेला आशीर्वाद ही माझ्यासाठी अनमोल संपत्ती आहे. ‘सुखदा’ उपक्रमामुळे कोथरुडमधील माझ्या लेकींचं बाळंतपण सुखरूप पार पडतंय, हे पाहणं ही माझ्यासाठी एक वेगळीच समाधानाची भावना असल्याचे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महत्वपूर्ण घोषणा केली. कोथरूडमधला पुरुष आणि महिला एकही मोतीबिंदू असणारा असणार नाही. येत्या सहा महिन्यात कोथरूड मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प. दुसरा कोथरूड महिलांच्या कॅन्सरने मुक्त. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नोकरी आणि व्यवसाय करण्याची इच्छा असलेली एकही महिला कोथरूड मध्ये येत्या वर्षभरात नोकरीशिवाय राहणार नाही. असे तीन संकल्प यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.