वैभव पाटील यांच्या प्रवेशाने त्यांच्या मतदारसंघातील भाजप आता आणखी बळकट झाला आहे – मंत्री चंद्रकांत पाटील

79

मुंबई : मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालयात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात विटा, सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटाचे वैभव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मंगळवारी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे परिवारात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख, भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, खानापूर आटपाडी मतदारसंघाने नेहमी भाजपच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. आता वैभव पाटील यांच्या प्रवेशाने या मतदारसंघातील भाजप आता आणखी बळकट झाला आहे. विट्यात आमचे विनोद गोसावी वकील, अनिल अप्पा बाबर, असे जुने कार्यकर्ते आहेत. तसेच गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर व आटपाडीचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे मोठे नेते देखील भाजपमध्ये आहेत. या सर्वांच्या बरोबर आता वैभव पाटील आल्याने पक्षाची मतदारसंघात मोठी ताकद वाढली आहे. विकासासाठी वैभव पाटील यांच्या पाठीशी राहू असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

या प्रवेशाबाबत बोलताना वैभव पाटील म्हणाले, मतदारसंघ व विटा शहराचा विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी देशपातळीपासून गावपातळीपर्यंत सक्रिय असलेल्या भाजपाशिवाय पर्याय नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.