विद्यापीठाचा शैक्षणिक आणि प्रशासकीय कारभार सुरळीतपणे पार पडावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

6

मुंबई :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे शासकीय निवासस्थान, सिंहगड, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत विद्यापीठाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण व प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाचा शैक्षणिक आणि प्रशासकीय कारभार सुरळीतपणे पार पडावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत सूचना दिल्या कि, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी परीक्षा वेळेत घेणे आणि निकाल निश्चित वेळेत जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशात अडथळे येणार नाहीत. यासाठी काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव संतोष खोरगडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.