भक्तिरसात न्हाऊन आणि योगाचे महत्व जाणून घेऊन, २१ जून ला भक्तीच्या उत्सवात आणि योगाच्या साधनेत नक्की सहभागी व्हा… पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

सांगली : २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन. सांगली जिल्हा परिषद आणि सांगली जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने योगाचा जागतिक विक्रम करण्याचा प्रयन्त करणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. “भक्तीयोग” या विशेष उपक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, एकाच वेळेला एका ठिकाणी जे योग करून दाखवले जातील त्याला शेकडो लोकांनी , शालेय विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी, सरकारी कर्मचारी अशा सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी योगा करायचा आहे. यावेळी भक्तिसंगीताची पार्श्वभूमी असेल. भक्तिसंगीताच्या तालावर, वारीदरम्यान भक्तिरसामध्ये न्हाऊन निघून योगा हि आपल्या आरोग्याची, मनाची, आत्म्याची आवश्यकता आहे. त्याला एका अर्थाने प्रकट रूप देऊया असे पाटील यांनी सांगितले.
या भक्तिरसात न्हाऊन आणि योगाचे महत्व जाणून घेऊन, २१ जून ला सकाळी ०८:०० वाजता भक्तीच्या उत्सवात आणि योगाच्या साधनेत नक्की सहभागी व्हा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.