सर्व नागरिक, योगप्रेमी आणि वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने भक्ती योग या उपक्रमात सहभागी व्हावे , मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पुणे मुक्काम आणि आंतरराष्ट्रीय योग दिन एकाच दिवशी साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, योग आणि वारकरी परंपरेचा संगम साधणारा भक्ती योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पुणे शहर पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
२१ जून रोजी होणार जागतिक योग दिवस बाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक, मंडल अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत पाटील यांनी सर्व नागरिक, योगप्रेमी आणि वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यासोबतच प्रामुख्याने नवीन मंडल अध्यक्ष निवड प्रक्रिये नंतर कार्यकारिणी व मंडलाचा आढावा देखील घेण्यात आला.
यावेळी खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.